Tuesday, 8 January 2013

काँग्रेसची सद्दी संपली, पण.....

टीव्हीवर अनेक वाहिन्या आहेत पण त्या एका वेळी एकसारखेच कार्यक्रम प्रसारित करतात, हा आपला नित्याचा अनुभव राजकारणाला देखील लागू पडू लागला आहे. १९८९ नंतर काँग्रेसची सद्दी संपली त्यामुळे राजकीय स्पर्धा जास्त विविधतापूर्ण होईल आणि जनतेपुढे नवे पर्याय तयार होतील अशी शक्यता निर्माण झाली होती, पण अनेक पक्ष अस्तित्वात आले तरी नवे पर्याय काही खुले झाले नाहीत. कारण पक्ष अनेक आहेत खरे; पण ते सगळे एकसारखे वागतात, भूमिका घेतात आणि दिसतात असा गेल्या दोन दशकाचा अनुभव आहे. त्यामुळे स्पर्धा वाढली पण स्पर्धेतून पर्याय निर्माण होण्याची प्रक्रिया मात्र विस्तारली नाही अशा विचित्र कोंडीत गेल्या दोन दशकांचे राजकारण अडकलेले दिसते.

काँग्रेसची सद्दी संपली, पण.....

सुहास पळशीकर, राज्यशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे.
साधना, दिवाळी अंक २०१२

No comments:

Post a Comment