महिलांच्या एकूण परिस्थिती विषयी खूप बोललं गेलं, कंटाळा येईपर्यंत चर्चा झाली. कायद्यात आणि मानसिकतेत बदलांच्या गोष्टी झाल्या. पण स्वतःला सुसंकृत-सुशिक्षित-सुज्ञ समजणाऱ्या समाज नावाच्या व्यवस्थेत खरचं बदल होणार का? आपल्या सगळ्या चर्चा एका ''फेविकॉल'' ने झडून गेल्या. महिलांकडे पाहण्याचा एकूण दृष्टीकोन कसा होता, कसा आहे याची काही उदाहरणं.
खालील जाहिरातींवरचा हा लेख नुकताच वाचनात आला. या लेखात अशा जाहिरातींचा सब-कोन्शिअस लेवलवर कसा परिणाम होत असतो ते लिहून अशा जाहिरातींवर गंभीर विचार करण्याची गरज मांडण्यात आली आहे.
मदर डेअरी
बजाज सी एफ एल बल्ब
हनी सिंग वरतीही बरीच होऊन गेली. त्या गोंधळात अनेकांनी त्याचं समर्थन केलं. त्या विषयाच्या संदर्भात फर्स्ट पोस्ट डॉट कॉम वर वाचलेला हा एक लेख या लेखात हनी सिंग सारखे तर बरेच आहेत आणि खूप आधीपासून आहेत असं लिहित अनेक भाषांमधल्या अनेक आक्षेपार्ह गाण्यांची उदाहरणं दिली आहेत.
परदेशी मासिकातल्या महिलांसंबंधी जाहिरातींवरची ही एक क्लिप
बदलांची सुरुवात वैयक्तिक पातळीवरच होऊ शकेल.